ग. कृपया प्रामाणिक प्रयत्न करावा
म. प्रतिक्रियेमध्ये शक्यतोवर उत्तरे टाकु नये
भ. उत्तरे एका आठवड्यानंतर प्रकाशित होतील
न. स्वत:चे मुल्यमापन स्वत:च करावे
स्वाध्याय पहिला:- क ते ज्ञ बाराखडी लिहुन काढा (२० गुण)
उत्तर:
स्वाध्याय दुसरा:- नाम, विशेष नाम आणि सर्वनाम यातील फरक उदाहरण देऊन स्पष्ट करा (५ गुण)
उत्तर:
१) नाम: व्यक्ती ,वस्तु,स्थान,पदार्थ किंवा जागेचा नामनिर्देश
व्यक्ती वाचक :सीता,हरीश.
जातीवाचक :गाव,नदी.
भाववाचक :लहानपण,धैर्य.
समूह वाचक :गर्दी,संघ .
द्रव्य वाचक :पाणी,सोने
२) सर्वनाम : नामाचा वारंवार उपयोग टाळण्यासाठी
पुरुषवाचक सर्वनाम : मी,तु.
निश्चय वाचक सर्वनाम : हे ,ते,त्या,
अनिश्चय वाचक सर्वनाम : कोणी,काही.
संबंध वाचक सर्वनाम : जो,जी ,जे, ज्याला.
प्रश्न वाचक सर्वनामे : कोण ?कोणाला ? कोणाचा ? कोणता ? कोणी?
३) विशेषनाम\विशेषण : नाम व सर्वनाम बद्दल अधिक माहिती देण्यासाठी वापरतात .
गुण वाचक विशेषण :लहान ,मोठा,सुंदर ,हुशार .
संख्या वाचक विशेषण : एक,दोन.तीन.
परिणामवाचक विशेषण :चांगला परिणाम ,वाईट परिणाम .
संकेत वाचक विशेषण :हे ,ते .
स्वाध्याय तिसरा:- खालील म्हणींचे लाक्षणिक अर्थ लिहा (१५ गुण)
उत्तर:
अ. उचलली जीभ लावली टाळ्याला
-- काहीही विचार न करता बोलणे
ब. कोल्हा काकडीला राजी
-- क्षुद्र माणसे क्षुद्र गोष्टींनी समाधानी होऊन बसतात वं स्वत:चे नुकसान करून घेतात
क. खाई त्याला खवखवे
-- जे लोक चुकीचं किंवा बेकायदा काम करतात ते कशा ना कशा प्रकारे स्वत:च त्याला वाचा फोडतात
ड. आंधळा दळतो कुत्रा पीठ खातो
-- काही लोक दुसऱ्याच्या परिश्रमाने आपले हेतु साध्य करून घेतात. परिश्रम करणारा त्याच स्थितीत राहतो
इ. ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण लागला
-- चांगले गुण अंगी लागण्याऐवजी वाईट गुण मात्र लवकर लागतात असा अनुभव आहे. याकरितां वाईट गुण असणारांची संगत पूर्णपणें वर्ज्य करावी.काही फायदा दिसत असेल तरी बळी पडु नये.
स्वाध्याय चौथा:- खालील इंग्रजी शब्दांचे पर्यायी मराठी शब्द लिहा (१० गुण)
उत्तर:
अ. Co-operative - सहकारी
ब. Switch - कळ
क. Button - गुंडी
ड. Baniyan - गंजीफ्रॉक, बांडीस
ए. Contractor - कंत्राटदार
फ. Vice Chancellor - कुलगुरू
ग. Swimming pool - जलतरण\पोहण्याचा तलाव
ह. Bus Stand - बस स्थानक
इ. Medical\Pharmacy Store - औषधालय
ज. Panther - बिबळ\बिबट्या
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(एकुण गुण ५०)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
👍शुभेच्छा!