विशेष पोस्ट
मराठी म्हणी व त्यांचे अर्थ
म्हणी आणि वाक्प्रचार वापरून आपण आपले विचार प्रभावी पणे मांडु शकतो, अर्थात समोरच्याला सुद्धा त्यांचे अर्थ माहित असतील तर . त्यामुळे ह्या म्हण...
बुधवार, ५ डिसेंबर, २०१८
रविवार, १८ नोव्हेंबर, २०१८
रविवार, ११ नोव्हेंबर, २०१८
रविवार, ७ ऑक्टोबर, २०१८
शुक्रवार, ५ ऑक्टोबर, २०१८
बुधवार, ३ ऑक्टोबर, २०१८
रविवार, १६ सप्टेंबर, २०१८
रविवार, १८ मार्च, २०१८
बुधवार, २५ ऑक्टोबर, २०१७
मराठी स्वाध्याय मालिका : भाग २ (उत्तरित)
सुचना:
ग. कृपया प्रामाणिक प्रयत्न करावा
म. प्रतिक्रियेमध्ये शक्यतोवर उत्तरे टाकु नये
भ. उत्तरे एका आठवड्यानंतर प्रकाशित होतील
न. स्वत:चे मुल्यमापन स्वत:च करावे
स्वाध्याय पहिला:- क ते ज्ञ बाराखडी लिहुन काढा (२० गुण)
उत्तर:
स्वाध्याय दुसरा:- नाम, विशेष नाम आणि सर्वनाम यातील फरक उदाहरण देऊन स्पष्ट करा (५ गुण)
उत्तर:
१) नाम: व्यक्ती ,वस्तु,स्थान,पदार्थ किंवा जागेचा नामनिर्देश
व्यक्ती वाचक :सीता,हरीश.
जातीवाचक :गाव,नदी.
भाववाचक :लहानपण,धैर्य.
समूह वाचक :गर्दी,संघ .
द्रव्य वाचक :पाणी,सोने
२) सर्वनाम : नामाचा वारंवार उपयोग टाळण्यासाठी
पुरुषवाचक सर्वनाम : मी,तु.
निश्चय वाचक सर्वनाम : हे ,ते,त्या,
अनिश्चय वाचक सर्वनाम : कोणी,काही.
संबंध वाचक सर्वनाम : जो,जी ,जे, ज्याला.
प्रश्न वाचक सर्वनामे : कोण ?कोणाला ? कोणाचा ? कोणता ? कोणी?
३) विशेषनाम\विशेषण : नाम व सर्वनाम बद्दल अधिक माहिती देण्यासाठी वापरतात .
गुण वाचक विशेषण :लहान ,मोठा,सुंदर ,हुशार .
संख्या वाचक विशेषण : एक,दोन.तीन.
परिणामवाचक विशेषण :चांगला परिणाम ,वाईट परिणाम .
संकेत वाचक विशेषण :हे ,ते .
स्वाध्याय तिसरा:- खालील म्हणींचे लाक्षणिक अर्थ लिहा (१५ गुण)
उत्तर:
अ. उचलली जीभ लावली टाळ्याला
-- काहीही विचार न करता बोलणे
ब. कोल्हा काकडीला राजी
-- क्षुद्र माणसे क्षुद्र गोष्टींनी समाधानी होऊन बसतात वं स्वत:चे नुकसान करून घेतात
क. खाई त्याला खवखवे
-- जे लोक चुकीचं किंवा बेकायदा काम करतात ते कशा ना कशा प्रकारे स्वत:च त्याला वाचा फोडतात
ड. आंधळा दळतो कुत्रा पीठ खातो
-- काही लोक दुसऱ्याच्या परिश्रमाने आपले हेतु साध्य करून घेतात. परिश्रम करणारा त्याच स्थितीत राहतो
इ. ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण लागला
-- चांगले गुण अंगी लागण्याऐवजी वाईट गुण मात्र लवकर लागतात असा अनुभव आहे. याकरितां वाईट गुण असणारांची संगत पूर्णपणें वर्ज्य करावी.काही फायदा दिसत असेल तरी बळी पडु नये.
स्वाध्याय चौथा:- खालील इंग्रजी शब्दांचे पर्यायी मराठी शब्द लिहा (१० गुण)
उत्तर:
अ. Co-operative - सहकारी
ब. Switch - कळ
क. Button - गुंडी
ड. Baniyan - गंजीफ्रॉक, बांडीस
ए. Contractor - कंत्राटदार
फ. Vice Chancellor - कुलगुरू
ग. Swimming pool - जलतरण\पोहण्याचा तलाव
ह. Bus Stand - बस स्थानक
इ. Medical\Pharmacy Store - औषधालय
ज. Panther - बिबळ\बिबट्या
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

(एकुण गुण ५०)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
👍शुभेच्छा!
मंगळवार, २६ सप्टेंबर, २०१७
मराठी स्वाध्याय मालिका : भाग १ (उत्तरांसह)
आपण स्वत:ला मराठी भाषिक म्हणवतो परंतु दिवसेंदिवस मराठी भाषेवरील प्रभुत्व आपण हरवत चाललो आहे. आजकाल मुले जेंव्हा विचारतात बाबा 76 म्हंजे मराठीत किती आणि ते कसे लिहायचे लिहुन द्याना तेंव्हा बाबांनाच आधी डोकं खाजवावं लागतं. हे असं होणं अपरिहार्य नव्हतं ते आपण घडवुन आणलं आहे. तेंव्हा हरवलेली मराठी जवळ करुया. मराठीत बोलण्याचा, आणि लिहिण्याचा आग्रह धरूया. आता स्वत:ची चाचणी स्वत:च घ्यायला हवी. तेंव्हाच मुलांना आपल्याकडुन उत्तरं मिळतील. मग करायचा का पहिला प्रयत्न - शुभस्य शीघ्रम्:
सुचना:
ग. कृपया प्रामाणिक प्रयत्न करावा
म. प्रतिक्रियेमध्ये शक्यतोवर उत्तरे टाकु नये
भ. उत्तरे एका आठवड्यानंतर प्रकाशित होतील
न. स्वत:चे मुल्यमापन स्वत:च करावे
स्वाध्याय पहिला:- ५१ ते १०० ह्या संख्या शब्दात लिहुन काढा (२० गुण)
उत्तर:
स्वाध्याय दुसरा:- पत्र लिहितांना तीर्थरूप कोणाला व तीर्थस्वरूप कोणाला लिहितात व का? (५ गुण)
उत्तर: पत्र लिहितांना आई आणि वडिलांना तीर्थरूप हे संबोधन वापरतात, व नात्यातील ईतर वरिष्ठ व्यक्तींना, जसे काका-काकु, मामा-मामी, तीर्थस्वरूप हे संबोधन वापरतात. भारतीय संस्कृतीत "मातृ देवो भव , पितृ देवो भव" संकल्पनेनुसार आईवडील हे मुलांसाठी तीर्थच असतात. ईतर वडीलधारी मंडळींचा पण आपण तसाच आदर करतो. कधी कधी आपण ऐकतो हे काका मला वडिलांसारखे आहेत. (तीर्थ नव्हे)तीर्थासारखे म्हणुन तीर्थस्वरूप.
स्वाध्याय तिसरा:- मराठी महिन्याची नावे क्रमवार लिहुन काढा (१० गुण)
उत्तर:
१. चैत्र
२. वैशाख
३. ज्येष्ठ
४. आषाढ
५. श्रावण
६. भाद्रपद
७. आश्विन
८. कार्तिक
९. मार्गशीर्ष
१०. पौष
११. माघ
१२. फाल्गुन
स्वाध्याय चौथा:- मराठी ऋतुंची नावे क्रमवार लिहुन काढा (५ गुण)
उत्तर:
१. वसंत
२. ग्रीष्म
३. वर्षा
४. शरद
५. हेमंत
६. शिशीर
स्वाध्याय पाचवा:- खालील इंग्रजी शब्दांचे पर्यायी मराठी शब्द लिहा (१० गुण)

५१ एक्कावन्न
|
६१ एकसष्ठ
|
७१ एक्काहत्तर
|
८१ एक्क्याऐंशी
|
९१ एक्क्याण्णव
|
५२ बावन्न
|
६२ बासष्ठ
|
७२ बाहत्तर
|
८२ ब्याऐंशी
|
९२ ब्याण्णव
|
५३ त्रेपन्न
|
६३ त्रेसष्ठ
|
७३ त्र्याहत्तर
|
८३ त्र्याऐंशी
|
९३ त्र्याण्णव
|
५४ चौपन्न
|
६४ चौसष्ठ
|
७४ चौर्याहत्तर
|
८४ चौऱ्याऐंशी
|
९४ चौऱ्याण्णव
|
५५ पंचावन्न
|
६५ पासष्ठ
|
७५ पंच्याहत्तर
|
८५ पंच्याऐंशी
|
९५ पंच्याण्णव
|
५६ छप्पन्न
|
६६ सहासष्ठ
|
७६ शहात्तर
|
८६ शहाऐंशी
|
९६ शहाण्णव
|
५७ सत्तावन्न
|
६७ सदुसष्ठ
|
७७ सत्याहत्तर
|
८७ सत्त्याऐंशी
|
९७ सत्त्याण्णव
|
५८ अठ्ठावन्न
|
६८ अडुसष्ठ
|
७८ अठ्ठ्याहत्तर
|
८८ अठ्ठ्याऐंशी
|
९८ अठ्ठ्याण्णव
|
५९ एकोणसाठ
|
६९ एकोणसत्तर
|
७९ एकोणऐंशी
|
८९ एकोणनव्वद
|
९९ नव्व्याण्णव
|
६० साठ
|
७० सत्तर
|
८० ऐंशी
|
९० नव्वद
|
१०० शंभर
|
स्वाध्याय दुसरा:- पत्र लिहितांना तीर्थरूप कोणाला व तीर्थस्वरूप कोणाला लिहितात व का? (५ गुण)
उत्तर: पत्र लिहितांना आई आणि वडिलांना तीर्थरूप हे संबोधन वापरतात, व नात्यातील ईतर वरिष्ठ व्यक्तींना, जसे काका-काकु, मामा-मामी, तीर्थस्वरूप हे संबोधन वापरतात. भारतीय संस्कृतीत "मातृ देवो भव , पितृ देवो भव" संकल्पनेनुसार आईवडील हे मुलांसाठी तीर्थच असतात. ईतर वडीलधारी मंडळींचा पण आपण तसाच आदर करतो. कधी कधी आपण ऐकतो हे काका मला वडिलांसारखे आहेत. (तीर्थ नव्हे)तीर्थासारखे म्हणुन तीर्थस्वरूप.
स्वाध्याय तिसरा:- मराठी महिन्याची नावे क्रमवार लिहुन काढा (१० गुण)
उत्तर:
१. चैत्र
२. वैशाख
३. ज्येष्ठ
४. आषाढ
५. श्रावण
६. भाद्रपद
७. आश्विन
८. कार्तिक
९. मार्गशीर्ष
१०. पौष
११. माघ
१२. फाल्गुन
स्वाध्याय चौथा:- मराठी ऋतुंची नावे क्रमवार लिहुन काढा (५ गुण)
उत्तर:
१. वसंत
२. ग्रीष्म
३. वर्षा
४. शरद
५. हेमंत
६. शिशीर
स्वाध्याय पाचवा:- खालील इंग्रजी शब्दांचे पर्यायी मराठी शब्द लिहा (१० गुण)
अ. Galaxy - आकाशगंगा-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ब. Stem - खोड, बुंधा
क. Table - मेज
ड. Pillow cover - उशीची खोळ
ए. Electricity bill - वीज देयक
फ. Compound Interest - चक्रवाढ व्याज
ग. Landslide - भूस्खलन
ह. Partial solar eclipse - खंडग्रास सुर्यग्रहण
इ. Engineer - अभियंता
ज. Self-study - स्वाध्याय
(एकुण गुण ५०)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
👍शुभेच्छा!
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)