आज मुलांना घरात मराठीची थोडी सक्ती करणे आवश्यक आहे. पण जिथे पालकच संकरित मराठी बोलत सुटतात तिथे मुलांना कितपत दोष द्यावा. आडात नसेल तर पोहऱ्यात येणार कुठुन. पण जर प्रामाणिक इच्छा असेल तर याला आळा घालणे सहज शक्य आहे. तेंव्हा जर का आपल्या मायबोलीचे पाईक व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर आपण सर्वांनी यावर मेहनत घेणे आता अपरिहार्य आहे . चला सुरुवात करुया.
आजचे शब्द:
एक एक शब्द घ्यायला वेळ लागेल म्हणुन मग एकमेकाशी संबंधित काही शब्द आपण सोबत बघत जाऊ.
Engineer = अभियांत्रिक/अभियंता
Engineering = अभियांत्रिकी
Medicine = औषधी
Medical Store = औषधाचे दुकान\औषधालय
Bucket = बादली
आतापर्यंत आपण खालील शब्द शिकलो:
Bio-technology = जैवतंत्रज्ञान
Biological = जैविक/जैवशास्त्रीय
Bacteria = जीवाणु
Virus = विषाणु
Antibiotic = प्रतिजैविक
वाक्यात उपयोग: बगीच्यात बाकडयावर बसायला आज काल जागाच मिळेनासी झाली आहे.
Television set = दूरचित्रवाणी संच
वाक्यात उपयोग: दूरचित्रवाणीने मनोरंजनाच्या क्षेत्रात क्रांती घडविली.
Problem = अडचण \ समस्या \ प्रश्न \ पेच \ त्रास
वाक्यात उपयोग: माझी एक अडचण दूर करशील का?
Internet = आंतरजाल\आंतर्जाल
वाक्यात उपयोग: आंतरजाल हे ज्ञानाचं अफाट भांडार आहे.
Light = दिवा \ उजेड \ प्रकाश \ हलका \सौम्य
वाक्यात उपयोग: तो दिवा लाव \ आज मी थोडं हलकंच जेवणार आहे
Wife = पत्नी\बायको
वाक्यात उपयोग: हि माझी पत्नी \ हि माझी बायको.
Mister = पती\नवरा
वाक्यात उपयोग: हे माझे पती \ हा माझा नवरा.
Contractor = कंत्राटदार
वाक्यात उपयोग: कंत्राटदारांच्या कामावर पालिकेचं काहीच नियंत्रण नसतं
Bottle = बाटली
वाक्यात उपयोग: आज माझ्याकडुन दुधाची बाटली फुटली.
To get bored = कंटाळा येणे, वीट येणे
वाक्यात उपयोग: बसुन बसून मला कंटाळा आला.
Table = मेज
वाक्यात उपयोग: पुस्तक त्या मेजावर ठेव.
Plan = योजना, बेत
वाक्यात उपयोग: मी केलेला बेत साफ फसला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा