एखाद्या म्हणीचा अर्थ किंवा संदर्भ हवा असल्यास टिप्पणी टाका.
आतापर्यंत आपण खालील म्हणी शिकलो:
-------------------------------------------------
झाकली मूठ सव्वा लाखाची
अर्थ: आपले ज्ञान किंवा संपत्ती याबद्दल फार वाच्यता न केल्यास लोक आपल्याकडे संभावित श्रीमंत किंवा ज्ञानी म्हणून बघतात. म्हणून फार बोलून आपली वस्तुस्थिती उघड करून घेऊ नये.
🌼
नावडतीचे मीठ अळणी
अर्थ: ह्या म्हणीचा शाब्दिक अर्थ हा सासु आणि सुन ह्या नात्यावर योजिलेला आहे. नावडत्या सुनेने कितीही चांगले काम केले तरी सासु त्यात खोट काढणारच. लाक्षणिक अर्थात, आपल्याला आवडत नसलेल्या व्यक्तीचे चांगले काम देखील आपल्याला सहज मान्य होत नाही वं त्यामुळे आपण त्यात काही ना काही दोष शोधण्याचा प्रयत्न करतो.
🌼
कानामागून आली आणि तिखट झाली
अर्थ: एखाद्याने नंतर येऊन आणि कमी अनुभव असुनही वरचढ कामगिरी करून पुढे निघून जाणे.
ह्या म्हणीचा शाब्दिक अर्थ हा सासू आणि सून ह्या नात्यावर योजिलेला आहे. सून घरात आल्यानंतर ज्याप्रमाणे हळुहळु आपली चुणूक दाखवत कारभार आपल्या हातात घेते आणि सासुला वरचढ होऊन बसते. त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती घरी किंवा कामाच्या ठिकाणी आपल्यापेक्षा नंतर येऊन आणि कमी अनुभवी असुनही आपल्यापेक्षा वरचढ कामगिरी करून पुढे निघून जाते.
अर्थ: आपलीच बरीच कामे पडली असतांना दुसऱ्याने काम सांगणे या परिस्थितीत हि म्हण वापरतात.
शाब्दिक अर्थात, कुटुंबाचे पोट भरायचे वांदे असतांना व्याह्याने भेट म्हणुन पाठवलेला घोडा हि एक आफत होऊन बसते कारण आता त्याच्या चारापाण्याची पण व्यवस्था लावावी लागणार.
अर्थ: जिथे आपला अधिकार चालतो तिथेच आपली मर्जी चालते किंवा बडेजाव चालतो. इतर ठिकाणी आपल्याला कोणी विचारत देखील नाही.
याचं एक उदाहरण म्हणजे गावाहुन शहरात कामाला आलेला माणुस इकडे हमाली का करेना पण जेंव्हा गावी जातो तेंव्हा मात्र साहेबाची मिजास आणतो आणि लोकसुद्धा त्याच्याकडे आदराने बघतात.
अर्थ: जवळ पैसा असतांना मागचा पुढचा विचार न करता तो पैसा चैनीत उधळायचा आणि मग पैसा संपला कि हाल अपेष्टा सहन करत बसावयाचे अशा वर्तनास हि म्हण वापरतात.
अर्थ: भोळ्या मनुष्यास फसविण्यासाठी लुच्चा माणुस काही काळ त्याच्या मर्जीप्रमाणे वागुन विश्वास संपादन करतो म्हणजे मग आपले काम काढुन घेण्यास सोपे जाते. परंतु आपल्या संकटसमयी शत्रूचे सहाय्य घेणे हे परिणामी नाशाचे कारण ठरू शकते.
अर्थ: ज्याला अतोनात राग येतो किंवा ज्याचा राग अनावर असतो त्याला पुढे भीक मागण्याची पाळी येते. इथे भीक म्हणजे याचना समजावी, ती कशाही साठी असु शकते.
अर्थ: काही लोकांना काहीच श्रम नं करता आपल्याला सगळं मिळावं असं वाटत असतं. कर्म नं करता फळाची आशा बाळगणे.
अर्थ: तांदुळ जेंव्हा सुपात पाखडले जातात तेंव्हा आनंदाने उड्या मारतात पण मग तेच जेंव्हा शिजायला आंधणात जातात तेंव्हा रडतात. तसेच मनुष्याचा आयुष्यात स्थित्यंतरे येत असतात. जी आज सुखात आहे त्यांना उद्या दु:खाची स्थिती येणे हे सृष्टी नियमाला अनुसरून आहे.
अर्थ: कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास परिणाम नुकसान दायक असतात.
अर्थ: कोण्या माणसाची वस्तु\जिन्नस त्याला भोगायला न मिळता अकल्पितपणे काही श्रम न करता दुसऱ्याला भोगायला मिळणे.
अर्थ: पूर्वग्रहदूषित किंवा स्वत: वाईट प्रवृत्ती असलेल्या माणसांना सगळीकडे दोषच दिसत असतात.
अर्थ: सांगितलेल्या गोष्टी किंवा सुचना या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देणे.
अशा लोकांना वारंवार सुचना करूनही त्याकडे दुर्लक्ष करून त्यांना हवं तेच करतात.
अर्थ: मुर्ख माणसाला कितीही समजावुन सांगितले तरी त्याचे मुर्खतेचे आचरण बदलत नाही.
🌼
घरचे झाले थोडे आणि व्याह्याने धाडले घोडे
अर्थ: आपलीच बरीच कामे पडली असतांना दुसऱ्याने काम सांगणे या परिस्थितीत हि म्हण वापरतात.
शाब्दिक अर्थात, कुटुंबाचे पोट भरायचे वांदे असतांना व्याह्याने भेट म्हणुन पाठवलेला घोडा हि एक आफत होऊन बसते कारण आता त्याच्या चारापाण्याची पण व्यवस्था लावावी लागणार.
🌼
गावचा राजा गावात बळी, परगावी गाढवे वळी
अर्थ: जिथे आपला अधिकार चालतो तिथेच आपली मर्जी चालते किंवा बडेजाव चालतो. इतर ठिकाणी आपल्याला कोणी विचारत देखील नाही.
याचं एक उदाहरण म्हणजे गावाहुन शहरात कामाला आलेला माणुस इकडे हमाली का करेना पण जेंव्हा गावी जातो तेंव्हा मात्र साहेबाची मिजास आणतो आणि लोकसुद्धा त्याच्याकडे आदराने बघतात.
🌼
असेल तेंव्हा दिवाळी नसेल तेंव्हा शिमगा
अर्थ: जवळ पैसा असतांना मागचा पुढचा विचार न करता तो पैसा चैनीत उधळायचा आणि मग पैसा संपला कि हाल अपेष्टा सहन करत बसावयाचे अशा वर्तनास हि म्हण वापरतात.
🌼
उंदराला मांजर साक्ष
अर्थ: भोळ्या मनुष्यास फसविण्यासाठी लुच्चा माणुस काही काळ त्याच्या मर्जीप्रमाणे वागुन विश्वास संपादन करतो म्हणजे मग आपले काम काढुन घेण्यास सोपे जाते. परंतु आपल्या संकटसमयी शत्रूचे सहाय्य घेणे हे परिणामी नाशाचे कारण ठरू शकते.
🌼
अति रागा भीक मागा
अर्थ: ज्याला अतोनात राग येतो किंवा ज्याचा राग अनावर असतो त्याला पुढे भीक मागण्याची पाळी येते. इथे भीक म्हणजे याचना समजावी, ती कशाही साठी असु शकते.
🌼
दे रे हरी पलंगावरी
अर्थ: काही लोकांना काहीच श्रम नं करता आपल्याला सगळं मिळावं असं वाटत असतं. कर्म नं करता फळाची आशा बाळगणे.
🌼
आंधणातले रडतात आणि सुपातले हसतात
अर्थ: तांदुळ जेंव्हा सुपात पाखडले जातात तेंव्हा आनंदाने उड्या मारतात पण मग तेच जेंव्हा शिजायला आंधणात जातात तेंव्हा रडतात. तसेच मनुष्याचा आयुष्यात स्थित्यंतरे येत असतात. जी आज सुखात आहे त्यांना उद्या दु:खाची स्थिती येणे हे सृष्टी नियमाला अनुसरून आहे.
🌼
अचाट खाणे अन मसणात जाणे
अर्थ: कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास परिणाम नुकसान दायक असतात.
🌼
शिंक्याचे तुटले बोक्याचे पिकले
अर्थ: कोण्या माणसाची वस्तु\जिन्नस त्याला भोगायला न मिळता अकल्पितपणे काही श्रम न करता दुसऱ्याला भोगायला मिळणे.
🌼
कावीळ झालेल्याला सगळे जग पिवळे
अर्थ: पूर्वग्रहदूषित किंवा स्वत: वाईट प्रवृत्ती असलेल्या माणसांना सगळीकडे दोषच दिसत असतात.
🌼
नळी फुंकली सोनारे, इकडुन तिकडे गेले वारे
अर्थ: सांगितलेल्या गोष्टी किंवा सुचना या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देणे.
अशा लोकांना वारंवार सुचना करूनही त्याकडे दुर्लक्ष करून त्यांना हवं तेच करतात.
🌼
गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता
अर्थ: मुर्ख माणसाला कितीही समजावुन सांगितले तरी त्याचे मुर्खतेचे आचरण बदलत नाही.
🌼
पाटलाचं घोडं महाराला भूषण
ज्याची वस्तू आहे त्याच्यापेक्षा इतरांनाच त्या वस्तूचे कौतुक वाटणे या अर्थाने ही म्हण वापरली जाते. पुर्वीच्या काळी पाटलाकडे वेगवेगळ्या कामांंसाठी नोकरगडी असायचे. त्यातच प्राणी सांभाळायला, फिरवायला महार लोक असायचे. तर पाटलापेक्षा त्या घोड्याचे कौतुक महारालाच जास्त अश्या लौकिकार्थाने हि म्हण वापरली जाते.
🌼
राजा उदार झाला आणि भोपळा काढून दिला
अर्थ: खूप मदत करतो आहे असा आव आणून अगदी क्षुल्लक किंवा काहीही मदत न करणे.
खरे तर एखादा राजा जेव्हां उदार होऊन बक्षीस देतो तेव्हां तो अंगावरील एखादे आभूषण किंवा भरपुर सोन्याच्या मोहरा वगैरे देतो असे आपण कथा कहाण्यामधून ऐकले आहे पण जेव्हां एखादा राजा खुश होऊन भोपळा भेट देतो, ज्याला काहीच किंमत नसते, अशा प्रसंगावर बेतलेली ही म्हण आहे.
🌼
म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो
अर्थ: एका घटनेने झालेल्या दोन तोट्यांविषयी बोलतांना ही म्हण वापरतात. ज्यातील दुसरा तोटा किंवा नुकसान हे इतके मोठे असते की त्यापुढे पहिल्याचं काहीच वाटत नाही.
नुसतीच म्हातारी मेली असती तर त्याचे फार दु:ख झाले असते. पण आता काळ सोकावतोय(एखाद्या गोष्टीची चटक लागणे) म्हटल्यावर आपल्या जीवावर बेतायची पाळी आली आहे.
🌼
तळे राखी तो पाणी चाखी
अर्थ: जो माणूस एखाद्या गोष्टीची जबाबदारी पत्त्करतो तो त्यापासून स्वत:चा फायदा करून घेणारच
उदाहरणार्थ: शेतात आपण पिकाची नासाडी टाळण्यासाठी जो सोकारी(राखणदार) ठेवतो. त्या सोकाऱ्याने स्वत:साठी शेतातले पीक-पाणी वापरणे.
🌼
मस्त आहे हे सर मुलांना उपयोगी आणि अभ्यासक दृष्टीने तयार केलेले हे काम मला खुप आवडले सर.
उत्तर द्याहटवाthanks
उत्तर द्याहटवा- न अवडणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली तरी ती वाईट दिसते त्या व्यक्तीचे काम आवडत नाही
उत्तर द्याहटवाडाव्या हाताचा मळ असणे या वाक्याचा अर्थ सांगा
उत्तर द्याहटवाडाव्या हाताचा मळ असा काही वाक्प्रचार मराठीत नाही.
हटवाएखादे काम एखाद्याला अगदी सोपे किंवा नेहमीच्या सरावातले असते तेंव्हा 'तळहाताचा मळ' हा वाक्प्रचार वापरतात.
बहुतेक हिंदीतील 'बाये हात का खेल' या वाकप्रचारंवरून भाषांतरीत होऊन हा गोंधळ उडाला असेल.
लंकेची पार्वती म्हणजे
उत्तर द्याहटवालंकेची पार्वती म्हणजे स्त्रीधन नसलेली, अर्थात अंगावर दागिने न घातलेली स्त्री.
हटवासीताहरण झाले तेंव्हा, रामाला मार्ग कळावा म्हणून सीतेने मार्गात आपले एक एक करून सगळे अलंकार उतरवून टाकले. ती जेव्हा लंकेला पोहोचली तेव्हा तिचे स्त्रीधनही तिच्याकडे नव्हते. त्यावरून हा वाक्प्रचार रूढ झाला आहे.
पाटलाच घोड महाराला भूषण
उत्तर द्याहटवाज्याची वस्तु आहे त्याच्यापेक्षा इतरांनाच त्या वस्तूचे कौतुक वाटणे या अर्थाने हि म्हण वापरली जाते. पुर्वीच्या काळी पाटलाकडे वेगवेगळ्या कामांंसाठी नोकरगडी असायचे. त्यातच प्राणी सांभाळायला, फिरवायला महार लोक असायचे. तर पाटलापेक्षा त्या घोड्याचे कौतुक महारालाच जास्त अश्या लौकिकार्थाने हि म्हण वापरली जाते.
हटवाAaplech dat aaplech oth
उत्तर द्याहटवामोडेन पण वाकणार नाही.... याचा अर्थ काय?
उत्तर द्याहटवामोडेन पण वाकणार नाही ह्या वाक्प्रचाराचा अर्थ असा कि कितीही त्रास होवो किंवा नुकसान होवो तत्वांची तडजोड करणार नाही. उदाहरणार्थ टिळकांचं प्रसिद्ध उदाहरण आहे, ' मी शेंगा खाल्ल्या नाही मी टरफलं उचलणार नाही'. टिळकांनी मार खाल्ला(मोडले) परंतु टरफलं उचलली नाही(वाकले नाही).
उत्तर द्याहटवाराजा उदार झाला आणि भोपळा काढुन दिला.... याचा अर्थ काय
उत्तर द्याहटवाखरे तर एखादा राजा जेव्हां उदार होऊन बक्षीस देतो तेव्हां तो अंगावरील एखादे आभूषण किंवा भरपुर सोन्याच्या मोहरा वगैरे देतो असे आपण कथा कहाण्यामधून ऐकले आहे पण जेव्हां एखादा राजा खुश होऊन भोपळा भेट देतो, ज्याला काहीच किंमत नसते, अशा प्रसंगावर बेतलेली हि म्हण आहे.
हटवाया म्हणीचा अर्थ असा कि खुप मदत करतो आहे असा आव आणुन काहीही न करणे किंवा न देणे.
म्हतारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो, ह्याचा अर्थ सांगता येईल का ??
उत्तर द्याहटवाएका घटनेने झालेल्या दोन तोट्यांविषयी बोलतांना हि म्हण वापरतात. ज्यातील दुसरा तोटा किंवा नुकसान हे इतके मोठे असते कि त्यापुढे पहिल्याचं काहीच वाटत नाही.
हटवात्याच जागी का नुसतीच म्हातारी मेली असती(म्हणजे एकच नुकसान झाले असते) तर त्याचेच फार दु:ख झाले असते.
वडाची
उत्तर द्याहटवाखुप छान माहिती दिली आहे सर।
उत्तर द्याहटवाबाजीरावाचा नातू आसणे
उत्तर द्याहटवाइकडे आड तिकडे विहीर चा वाक्यात उपयोग करा ना plz सर
उत्तर द्याहटवाउद्या गणिताची परीक्षा आहे आणि माझा अभ्यास झालेला नाही. परीक्षेला गेलो तर नापास होणार आणि गेलो नाही तर सर ओरडणार. माझी परिस्थिती इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे.
हटवाअति तेथे माती ह्याचा वाक्यांत उपयोग सांगा
उत्तर द्याहटवाआवडतो म्हणून आईसक्रिम खाण्याचा सपाटाच लावला होता. सर्दी तापाने चांगला आठवडाभर झोपून होतो. झालीच ना अति तेथे माती.
हटवाकरावे तसे भरावे या म्हणीचा वाक्यात उपयोग करावा
उत्तर द्याहटवाअभ्यास करायला पाहिजे होता तेव्हां मौजमस्ती केली, झालो नापास. करावे तसे भरावे हेच खरे.
हटवाकुश होणे म्हणजे काय?
उत्तर द्याहटवाकुश की कृश?
हटवाकृश होणे म्हणजे तब्येतीने बारीक होणे, रोडावणे.
Tale rakhe toh paani chaakhe
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
हटवाएक गोष्ट लक्षात घ्यावी की वाक्यात उपयोग हा वाक्प्रचारांचा होत असतो, म्हणींचा नाही. म्हण ही एक संपूर्ण वाक्यच असते. एका वाक्यात आणि नेमकेपणाने काही सांगण्यासाठी म्हणींचा वापर होतो.
हटवामी फक्त उदाहरण म्हणून काही म्हणी बोलण्यात कशा वापरू शकतो हे दाखवले आहे.
नाचता येईना अंगण वाकडे
अर्थ: आपल्यात असलेली उणीव झाकण्यासाठी, इतर वस्तूंना, माणसांना, परिस्थितीला दोष देणे
उदाहरणार्थ: त्याला मुळात गाताच येत नाही, माईक खराब आहे म्हणतो. नाचता येईना अंगण वाकडे असं काम आहे त्याचं.
Nice Sir
उत्तर द्याहटवाMarathi Mhani Aani Tyanche Arth - मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे अर्थ - Spardha Pariksha Marathi
झाकली मूठ सवालाखाची म्हणजे काय ?
उत्तर द्याहटवा'झाकली मूठ सव्वा लाखाची' म्हणजे आपले ज्ञान किंवा संपत्ती याबद्दल फार वाच्यता न केल्यास लोक आपल्याकडे संभावित श्रीमंत किंवा ज्ञानी म्हणून बघतात.
हटवाम्हणून फार बोलून आपली वस्तुस्थिती उघड करू नये
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाnavadtiche mith alani
उत्तर द्याहटवानावडतीचे मीठ अळणी
उत्तर द्याहटवाअर्थ: ह्या म्हणीचा शाब्दिक अर्थ हा सासु आणि सुन ह्या नात्यावर योजिलेला आहे. नावडत्या सुनेने कितीही चांगले काम केले तरी सासु त्यात खोट काढणारच. लाक्षणिक अर्थात, आपल्याला आवडत नसलेल्या व्यक्तीचे चांगले काम देखील आपल्याला सहज मान्य होत नाही वं त्यामुळे आपण त्यात काही ना काही दोष शोधण्याचा प्रयत्न करतो.
महातारी मेल्या चे दुख नाही या म्हणी चे अर्थ
उत्तर द्याहटवाअचाट खाणे, मसणात जाणे.. या म्हणीचा काही पुस्तकातील संदर्भ द्या..
उत्तर द्याहटवाकाणा मागुन आली आणि टिकट झाली
उत्तर द्याहटवापोटात एक आणि ओठात एक
उत्तर द्याहटवाखंडीच्या वरणात मुतणे
उत्तर द्याहटवा